आदर्श पालकत्व लेख क्रमांक 3 (ideal parenting)adarsh palaktv
आदर्श पालकत्व लेख क्रमांक 3 (ideal parenting) adarsh palaktv मागच्या लेख क्रमांक- 2 मध्ये आपण एक सूत्र बघितले की मुलांमुळे किंवा तुमच्या वैयक्तिक काही कारणामुळे तुमच्या समोर जो प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगात गोंधळून न जाता शांत राहणे व संयम बाळगणे शांततापूर्वक वर्तन ठेवणे आजच्या या तिसऱ्या लेखांमध्ये आपण एक दुसरे नवीन सूत्र शिकणार आहोत सूत्र सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती अशी एकदा एक मनुष्य मोकळ्या माळरानावर फिरण्यासाठी जातो .त्या मनुष्याला घोड्यांचे फार आकर्षण असते. गवतावरून फिरत असताना समोर त्याला आठ-दहा घोडे गवत खाताना दिसले .तो घोड्याच्या दिशेने धावत सुटला , पण तिथे पोहोचेपर्यंत सर्व घोडे इतरत्र पळून गेले. एक घोडा मात्र तिथेच होता मग तो माणूस त्याच्या जवळ गेला. पण बघतो तर काय तो घोडा नसून एक गाढव होते. मनुष्य निराश झाला. पण तो मनुष्य त्या गाढवाला घरी घेऊन आला आणि त्याची काळजी घेऊ लागला . काही दिवसांनी गाढव जरा धष्टपुष्ट झाल्यानंतर गाढवावर बसून फिरण्यासाठी न...