आदर्श पालक लेख क्रमांक 2(ideal parenting) adarsh palaktv



parentingarrow.blogspot.com

आदर्श पालकत्व लेख क्रमांक- 2 (adarsh palaktv)ideal parenting

    आदर्श पालकत्व या लेखमालेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या भागातील जे प्रश्न आपण बघितले त्यावर नीट चिंतन केले आहे का ? ते ठरवा आणि जर केलेले नसेल तर पहिला भाग बघून चिंतन करा . मग आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करा.
""""""""""""""""""""""""""'''"""@@@@@@@@@@@@@
        चला मित्रांनो , आता आपण एक चांगला पालक या लेख मालिकेतील दुसरा लेख बघूया.
 या लेखांमध्ये मुलांना घडवताना आवश्यक असणारे एक महत्त्वाचे सूत्र आपण जाणून घेणार आहोत . लेख वाचत असताना तुम्हाला वेळोवेळी त्या सूत्र विषयी जाणीव होईल ; आणि नाहीच कळालं तर लेखाच्या शेवटी समजून जाईल. तर चला मग आदर्श पालकत्वाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे टाकू या.
       सध्याचे जग फारच गतिमान झाले आहे .माणसांना शांतपणे एकमेकांशी बोलायला विचारविनिमय करायला वेळच नाही. अहो अगदी दोन - तीन दिवस न हसणारी माणसंही मी बघितलेली आहेत. सतत कोणत्यातरी तणावात असणारे व समस्यांनी, चिंतेने ग्रस्त असणारी माणसं पावलोपावली बघायला भेटतात ; आणि एक विशेष अशा चिंतातूर माणसांच्या घरातील वातावरणही त्या पद्धतीनेच गोंधळलेल्या अवस्थेतील व काहीसं निरस आणि बेचव दिसते.
         इतरांसारखे आपणही कोणत्यातरी विचारांनी समस्येने सतत चिंताग्रस्त असतो .गोंधळलेल्या मनस्थितीत असतो . "आज हे काम करायचं राहिलं"." आज ते काम करायचं राहिलं" असे अनेक विचार आपल्या मनात सतत सतत चालू असतात. आणि हेच विचार घेऊन आपण घरामध्ये प्रवेश करतो . मनामध्ये विचारांचा गोंधळ माजलेला असतो आणि गोंधळलेली अवस्था आपल्या पालकत्वा मध्ये एक मोठी आडकाठी निर्माण करते  .   गोंधळलेल्या अवस्थेत ज्यावेळेस आपण एखाद्या समस्येला तोंड देतो त्यावेळी नक्कीच आपल्या हातून रागाच्या भरात चुका घडण्याची शक्यता खूप जास्त असते . ठीक आहे ,मी काही घटना सांगतो त्या तुम्ही नीट बघा
  •  तुम्ही नुकतेच बाहेरून कामावरून घरात येऊन बसले आहात आणि तेव्हाच तुमच्या मुलाच्या हातातून टीव्हीचा रिमोट खाली पडला हो त्याच्यातील सेल निघून इतरत्र विखुरले गेले 
  • तुमच्या मुलाने शाळेतून आल्यानंतर घरात येताना बूट किंवा चप्पल दारातच रस्त्यात काढले 
  • त्याच्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी घरात आईकडे तो पदार्थ बनवण्यासाठी खूप हट्ट केला 
  • नवीन घेतलेला शर्ट खेळताना फाटला किंवा उसवला आणि तसाच तो मुलगा तुमच्याकडे ते दाखवण्यासाठी आला
  •  एखाद्या नवीन खेळण्यासाठी तुमच्याकडे हट्ट केला 
  • शाळेतून घरात आल्यावर दप्तर खुर्चीवर ठेवून दिले आणि आता तुम्हाला ऑफिसमधून आल्यावर बसण्यासाठी जागा नाही 
  • खेळत असताना मुलगा पडला आणि थोडं खरचटलं 
  • तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि तुमच्या मुलाने तुमच्या किंवा त्याच्या स्वतःच्या पॅंटीवर सॉस सांडून घेतला
     यांसारख्या अनेक घटना व प्रसंग तुम्हाला घराघरात सर्वत्र बघायला मिळत असतील त्यातले बरेच प्रसंग तर तुमच्याबरोबरही घडले असतील, हो ना.
          आता तुमच्या डोळ्यासमोर तुमच्याबरोबर वरीलपैकी एखादा प्रसंग घडला असेल तो प्रसंग आणा आणि त्या वेळचे तुमचे वर्तन आठवा. तुमचे वर्तन तुमच्या मुलासोबत किंवा मुली सोबत कसे होते; मोठ्या आवाजातील रागीट वर्तन होते की शांत व समजावण्याच्या सुरातील वर्तन होते. आणि  हेच महत्त्वाचे सूत्र आपल्याला आजच्या घटकांमध्ये समजून घ्यायचे आहे.
    घटना घडली ती घडली तेव्हा तुमचे काय वर्तन होते हे आता विसरा पण एक लक्षात ठेवा अशावेळी लगेच गोंधळलेल्या अवस्थेत जाऊ नये . जमदग्नीचा अवतार होऊन रागात मुलांना मारू नये . 
याउलट ;
       उदाहरणार्थ 
1)मुलाच्या हातून रिमोट पडून फुटला किंवा त्यातील सेल निघून अस्ताव्यस्त झाले तर त्याला रागवण्याचा ऐवजी समजावून सांगा "काय रे बाळा जरा काळजीपूर्वक वस्तू पकडत जा, बघ आता रिमोट फुटला ना आपला खर्च वाढला की नाही आता! आणि रिमोट ऐवजी दुसरी एखादी मौल्यवान वस्तू असती तर ,म्हणून वस्तू नीट घट्ट पकडत जा. तुला लागला नाही ना,? मग ठीक आहे असू दे ,आपण रिमोट नीट करूया. दाखव बरं आपल्याला नीट करता येते का? नाही तर मग दुकानातून आपल्याला दुरुस्त करून घ्यावा लागेल ."
      असेच शांततेच्या सुरात सांगून तर बघा मग कसा चमत्कार घडतो ते तुम्हाला दिसेलच हा माझ्या स्वतःच्या अनुभवातील नमुना मी तुमच्यासमोर सांगितला.
         हा प्रसंग घडून गेल्यानंतर मी ऑफिसला जाताना माझा डबा नेहमी माझ्या मुलानेच माझ्या बॅगमध्ये ठेवला आणि आजही ठेवतो पण त्याच्या या कामात चूक झालेली मला आता आठवतही नाही . हा फक्त शब्दांचा व पालक म्हणून आपल्या अवस्थेचा किंवा आपण केलेल्या प्रतिक्रियेचा परिणाम होय.
उदाहरण क्रमांक दोन
   खेळत असताना तुमचा मुलगा पडला व तुम्ही घेऊन दिलेला नवा शर्ट फाटला, व त्याला थोडेसे खरचटले.
       अशावेळी सामान्य  पालक मुलाला जवळ घेईल परंतु शर्ट फाटला याबद्दल राग मात्र नक्कीच व्यक्त करेल . आणि तुला नीट खेळता येत नाही का ?बघून खेळता येत नाही का ? आता नवीन शर्ट घेतला तो पण नीट सांभाळता आला नाही ?अशा प्रकारची वाक्य त्यात नक्की असणार.
      पण याच प्रसंगांमध्ये एक सजग पालक विद्यार्थ्यांशी मुलांशी संवाद साधेल . "बाळा कसा पडलास? तुला कुठे लागला दाखव? अरे तुझा शर्ट फाटला ! चल आपण शिवून घेऊ .तुला जास्त लागलं नाही ना? आणि खेळताना तर थोडफार खर्चटणारच थोडफार लागणारच. चल घरी हात, पाय धुऊन घे. शर्ट बदलून मग जा खेळायला."
      दोन्ही प्रतिक्रियांमध्ये फारसा फरक नाही परंतु याच थोडासा फरकामुळे त्या मुलांमध्ये किंवा आपल्या पाल्यामध्ये पालकांविषयी विचार करण्याच्या प्रक्रियेत नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात फरक पडेल. आपल्यापेक्षा इतर गोष्ट पालकांसाठी कमी महत्त्वाची आहे . माझे आरोग्य व माझी सुरक्षा हाच माझ्या पालकांसाठी प्राधान्याचा पहिला घटक आहे . ही भावना मुलांमध्ये निर्माण होईल .
      आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो : आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो. पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावात असणार्याा पालकांशी संवाद करावासा वाटत नाही. त्यांना सुचणार्याक नवीन कल्पना, विचार आणि स्वतःच्या समस्या तणावग्रस्त असणार्यात पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त असायला हवा.
       अर्थातच याचा वापरही पालकांनी सावधानतेने करायला हवा .नाहीतर मुलं अति लाडाने शेफारून जातील .यातही पालकांनी आपल्या विवेकबुद्धीने योग्य ती प्रतिक्रिया द्यावी. असे मी सुचवेन.
      थोडक्यात आजच्या लेखात आदर्श पालकत्वाचे एकच सूत्र मला तुम्हाला सांगायचे आहे की तुमच्यासमोर कसाही प्रसंग आला तर गोंधळून न जाता शांतपणे  हसत त्या प्रसंगाला सामोरे जा राग करू नका शांत रहा ,शांत रहा, शांत रहा ,संयमाने घ्या धन्यवाद
        



या ब्लॉग ला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन पोस्ट टाकल्यानंतर तुम्हाला लगेच माहिती मिळेल.
   

Comments

Popular posts from this blog

आदर्श पालकत्व लेख क्रमांक 3 (ideal parenting)adarsh palaktv

आदर्श पालक (लेख क्रमांक 1(adarsh palaktv)ideal parenting