आदर्श पालक (लेख क्रमांक 1(adarsh palaktv)ideal parenting

आदर्श पालकत्व या लेखमालेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

(adarsh palaktv)ideal parenting

     तुम्ही आत्ता नुकतेच पालक झालेले असाल,, किंवा पालक होणार असाल ,,, तसेच तुम्ही आधीच पालक असाल , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी येऊन पोहोचला आहात.मग हा लेख तुमच्यासाठीच आहे .
        पालक होणं ही एक अगदी आनंददायी भावना आहे; पण फक्त इतरांसारखा पालक होणं आणि एक सजग ,जाणता, चांगला पालक होणे यात मात्र नक्कीच फरक आहे.
        मग नुसतं पालक होण आणि चांगले पालक होणे यामध्ये नेमका फरक तो काय  ??  यामध्ये फक्त संयमाने, शांततेने आणि डोळसपणे घेतलेले निर्णय व काही वर्तन बदल अपेक्षित आहेत .          
     एवढ्या गोष्टी तुम्हाला जमल्या तर तुम्ही एक  चांगले पालक बनू शकता. 
        आपल्या मुलांना घडवताना फक्त असा विचार करू नका की तुमचे मूल आहे तर तो भविष्यातील या देशाचा एक  सुजान नागरिक कसा बनेल या गोष्टीचे ही भान आपल्याला असणे गरजेचे आहे.
           एक उत्तम पालक बनण्याची तुमची तयारी कोणीही करून घेऊ शकत नाही ;  पण आजपर्यंत अनेक पालकांनी ज्या चुका केल्या त्या कशा टाळायच्या; व मुलांशी वागताना , बोलताना कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक करायच्या या विषयी आपण नक्कीच बघूयात.
         आपल्या मुलाचे किंवा मुलीचे एक सुज्ञ व सजग नागरिकात रूपांतर करण्यासाठी आपल्याकडे सुमारे अठरा वर्ष आहेत; त्यामुळे लगेच त्याला सर्व काही शिकवण्याची घाई करण्यात काहीच अर्थ नाही.                   प्रत्येक मुलाची नैसर्गिक समज असते. एखाद्या घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याची, कारणमीमांसा करण्याची क्षमता विविध अनुभवांनी आपोआप वृद्धिंगत होत जाते ..हे समजण्यासाठी पुढे वाचा
     एक उदाहरण 
    समजा, तुम्ही तुमच्या मुलादेखत नजरेत भरतील इतके रुपये किंवा रक्कम घरातल्या एखाद्या ठिकाणी ठेवा;  आणि तुमच्या एखाद्या मित्राने किंवा बाहेरच्या व्यक्तीने जर तुमच्या मुलाला विचारले की बेटा तुझ्या पप्पांचे पैसे कुठे आहेत ??पप्पा पैसे कुठे ठेवतात ?  तर काय होईल?
       यातही अनेक शक्यता आहेत
  शक्यता   क्रमांक  1
  तुमचा मुलगा जर नुकताच बोलणं शिकला असेल समजा तीन-चार वर्षांचा असेल तर तो कदाचित सांगेलही , की पैसे कुठे आहेत .अर्थात यालाही अपवाद आहेतच पण ,,,,
        शक्यता क्रमांक दोन
       तोच मुलगा जर त्या पेक्षा वयाने थोडा जास्त असेल तर बहुधा तो सांगणार  नाही किंवा तिथून घरात तरी पळून जाईल, नाहीतर काहीतरी दुसरच नक्की सांगेल या प्रसंगांमधून एक गोष्ट कळते की,, वयातील फरकानुसार त्यांच्या वागण्यातही आपोआप बदल होत जाईल परिस्थिती हाताळण्याची त्याची कला वृद्धिंगत होत जाईल. तेव्हा तुम्ही तो बदल पटकन घडवण्याची घाई करण्यात काहीही मजा नाही ,आणि तशी गरजही नाही.
       आपण मुलांना," नेहमी खरे बोलावे"," खोटे बोलू नये " असंच सांगतो.  पण नेमकं खोटं कधी बोलायचं हे मुल कुठून शिकतात हे त्यांना कोण शिकवतं ही त्यांची वैयक्तिक नैसर्गिक क्षमता असते. तिचा आदर करा. त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवण्यात हातभार लावा .त्यांना मार्ग दाखवा बळजबरी करू नका   .                     मुलांना वळण लावताना आपल्याला पालक म्हणून आत्ताच्या काळात अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागेल.  ते आपण पुढे येणाऱ्या लेखांमध्ये सुटसुटीत मुद्द्यानुसार समजून घेणार आहोतच .
    प्रथम मी तुम्हाला खाली जे मुद्दे सांगतो त्यावर एक मिनिट विचार करा . प्रत्येक मुद्द्यावर थोडं थांबून शांततेने विचार करा
 मुद्दे पुढीलप्रमाणे
  • दिवसभरात मुलं तुमच्यासमोर असताना तुम्ही किती वेळ मोबाईल बघता?
  •  तुमच्या हातात मोबाईल असताना इतरांशी तुमचं वर्तन कसं असतं ?
  • तुम्हाला न विचारता तुमचा मोबाईल कोणी घेतला तर तुमची प्रतिक्रिया कशी असते?
  •  तुम्ही कोणत्याही अडचणीत शिवाय आर्थिक व्यवहारांचे ॲप्स सोडून तुमचा मोबाईल पासवर्ड फ्री ठेवू शकता का ?
  • दिवसभरातून किती वेळा तुम्ही मोबाईल हातात घेतात ?
  • तुम्ही मोबाईल केव्हा केव्हा बघता ?
असे अजून अनेक प्रश्न आहेत जे आपण पुढील लेखांमध्ये पाहणार आहोतच, पण आत्ता एवढ्यात बाबींचा विचार करूया .
(टीप -थोडं थांबून प्रश्नांचा विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका.)
   
वरील सर्व मुद्द्यांचे प्रामाणिकपणे चिंतन केल्यानंतर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की वरील सर्व प्रश्नांचे समाधान कारक व सकारात्मक उत्तरे तुम्हाला मिळालेली आहेत का सर्व प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळाली असतील तर हे चांगला पालक होण्याच्या दृष्टीने तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात परंतु वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर असमाधानकारक मिळाले असेल तर तुम्हाला नक्की बदल करणे आवश्यक आहे हे समजून घ्या  .
           मोबाईल मुळे माणसाच्या जीवनाला गती मिळाली माणसाने प्रथम चंद्रावर पाय ठेवला त्यावेळेची टेक्नॉलॉजी वापरण्यात आली त्याहीपेक्षा चार पट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आत्ताचा स्मार्टफोन्स मध्ये उपलब्ध आहे आणि आत्ताची पिढी तर जन्मताच इतके हुशार आहे की जणू सगळे पोटातून अभिमन्यू सारखे सगळं शिकून आल्यासारखे वाटतात सर्वसाधारणपणे आपण ज्यावेळी पालक बनतो त्या वेळी आपले वय सरासरी 30 च्या जवळपास असते मग इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जी टेक्नॉलॉजी आपण वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बघत आहोत तीच टेक्नॉलॉजी आपली मुले वयाच्या पाच-सहा वर्षांची असताना बघत आहेत म्हणजेच ती वयाने जरी आपल्यापेक्षा लहान असली तरी टेक्निकली आपल्या पेक्षा सुमारे पंचवीस ते तीस वर्षे पुढे आहेत
        बऱ्याचदा असेही दिसते की पालकांपेक्षा ही लहान लहान मुले मोबाईल अगदी सहजतेने वापरताना दिसतात त्यांची निरीक्षणशक्ती तर मोबाईलच्या वापराने आणखीनच धारदार झालेली आहे. म्हणून आपण मुलांना काय सांगतो, यापेक्षा मुलांसमोर आपलं वर्तन इतरांशी कसं असतं या गोष्टी त्यांच्या वागण्यावर अति प्रभाव पडतात म्हणून मुलांसमोर आपले वर्तन प्रेमपूर्वक ठेवा.  

या लेखात सांगितलेल्या मुद्द्यांवर शांततेने विचार करा हा पहिलाच लेख असल्याने आपण पुढील लेखांमध्ये टप्प्याटप्प्याने विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत

   
  कृपया पुढील लेखांची माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवीन लेख टाकल्यास तुम्हाला लगेच माहिती मिळेल, कारण आपण मोबाईलवर बऱ्याच साईटला व्हाट्सअप किंवा सोशल मीडिया इतर ठिकाणी एक्टिव असल्याने विसरून जाण्याची शक्यता जास्त आहे .म्हणून न चुकता सबस्क्राईब करा 


पुढील लेख वाचण्यासाठी आपण इच्छुक आहात की नाही ते ही कमेंट करून नक्की कळवा व या लेखाविषयी मतही नोंदवा धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

आदर्श पालकत्व लेख क्रमांक 3 (ideal parenting)adarsh palaktv